You are currently viewing आंबोलीत ट्रक दुचाकी अपघातात वेताळ बांबर्डेतील युवकाचा मृत्यू

आंबोलीत ट्रक दुचाकी अपघातात वेताळ बांबर्डेतील युवकाचा मृत्यू

आंबोली

आंबोली घाटमार्गे मित्रांसोबत जात असताना दुचाकीच्या ट्रकला बसलेल्या धडके नंतर ट्रकच्या चाकाखाली चिरडून एक युवक जागीच ठार झाला. समीर शशिकांत जाधव (वय ४२, कपील नगर बाटी, वेताळ बांबर्डे ता. कुडाळ ) असे त्याचे नाव आहे.
त्याच्या सोबत अन्य दोन युवक आपापल्या दुचाकीवर होते. रात्री पावणे बाराच्या सुमारास आंबोली नानापाणी येथे हा अपघात झाला. याबाबत अधिक तपास आंबोली पोलिस करीत आहेत.
आंबोली घाटात ट्रकला ओव्हरटेक करताना समोरून येणारे वाहन दिसताच मोटरसायकल चालकाने ब्रेक मारल्याने मोटर सायकल रस्त्याच्या उजव्या बाजूस पडली तर मोटरसायकलस्वार ट्रकच्या मागील चाका खाली सापडल्याने चेंदामेंदा होऊन तो मृत्युमुखी पडला. सदर घटना मंगळवारी रात्रौ. साडे अकराच्या सुमारास आंबोली घाटात नानापाणी वळणाजवळ घडली.
सदरच्या अपघाताची भीषणता बघून मोटरसायकलस्वारा मागाहून येणाऱ्या मित्रास याचा जबरदस्त मानसिक धक्का बसला. ही दोन्ही वाहने सावंतवाडीहून बेळगांवच्या दिशेने जात होती. हा अपघात साधारणतः साडे अकरा- पावणेबाराच्या सुमारास घडला. पुढील तपास पोलिस करत आहेत.
याबाबत ट्रक चालक मुबारक हुसेन शेख ( ४२, रा. आझादनगर, चंदगड, कोल्हापूर ) याने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आपण मालवण ते बेळगाव अशी ट्रकमधून चिरे वाहतूक करत असताना सावंतवाडी ते आंबोली जाणार्‍या दोन दुचाकी माझ्या ट्रकच्या मागुन येत होत्या ते ट्रकच्या उजवीकडील आरशात पाहील्या. त्यापैकी एकाने ट्रकला ओव्हरटेक करत पुढे जात असताना समोरील वळणावर अचानक एक चारचाकी वाहन आल्याने सदर दुचाकीस्वार हा त्याच्या गाडीवरील ताबा सुटल्याने दुचाकीसह रत्यावर पडुन माझ्या ताब्यातील ट्रकच्या उजव्याबाजुकडील पाठीमागील चाकाखाली आला.
यावेळेस मोठा आवाज झाल्यामुळे मी माझा ताब्यातील ट्रक जागीच थाबवला. यानंतर मी गाडीतून खाली उतरुन पाहीले असता सदर दुचाकीस्वार हा माझ्या गाडीच्या (ट्रक क्रमांक एम एच 10 सीआर 9662) पाठीमागील चाकाच्या खाली आल्याचे मला दिसले. ट्रक ने उजव्या बाजुकडील मागील चाक हे त्याच्या शरिराच्या मध्यभागावर होते. चाकाचे मागील बाजूस कमरेच्या वरील भाग आणि चाकाच्या पुढील बाजूस त्याचे दोन्ही पाय दिसत होते या प्रकार तो चाकात अडकलेला होता.
त्यानंतर १०८ रुग्णवाहीकेमधुन आलेले डॉक्टर यांनी त्याला तपासून तो मयत झाला असल्याचे सांगितले. त्याच्या ताब्यातील टिव्हीएस कंपनिची ज्युपीटर दुचाकी क्रमांक एम (एच 07 ए के 0082 ) ही ट्रकच्या उजव्या बाजुला रस्त्याकडेला पडलेली होती. त्याठिकाणी आलेल्या दुचाकीस्वाराच्या गावातील लोकांकडून अपघातातील मयताचे नाव हे समिर शशिकांत जाधव, राहणार वेताळ बांबर्डे, कपील नगर बाटी, तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग असे असल्याचे समजले, अशी माहिती पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − eleven =