You are currently viewing मुलांच्या शारिरीक विकासासाठी क्रिडा स्पर्धांची गरज – मुख्याधिकारी सोंडगे

मुलांच्या शारिरीक विकासासाठी क्रिडा स्पर्धांची गरज – मुख्याधिकारी सोंडगे

वेंगुर्ला

तंदुरुस्त भारत घडविण्यासाठी क्रिडा स्पर्धांची फार गरज आहे. मुलांच्या बौद्धिक विकासाबरोबर त्यांचा शारिरीक विकास होणे आवश्यक आहे. वासुदेव गावडे यांनी व्ही.जी.फिटनेसच्या माध्यमातून अशा प्रकारच्या क्रिडा स्पर्धा घेऊन स्तुत्य उपक्रम राबविला असल्याचे गौरवोद्गार वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे यांनी काढले. व्ही.जी.फिटनेस सेंटरच्या वार्षिक क्रिडा स्पर्धा २२ मे रोजी उत्साहात पार पडल्या. याचे उद्घाटन मुख्याधिकारी सोंडगे यांच्या हस्ते झाले. या क्रिडा स्पर्धेत ४१ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यांच्या वयानुसार सहा गट पाडण्यात आले.

गटातील प्रत्येक विजेत्याला चषक प्रदान करण्यात आले. तसेच सहभागी स्पर्धकाला मेडल देण्यात आले. विशेष म्हणजे पालकांनीही या स्पर्धेत सहभाग घेऊन बक्षिस पटकाविली. प्रा.बी.एम.भैरट यांनी मुलांसाठी व पालकांसाठी फिटनेसचे महत्त्व सांगितले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुभाष तोडकर, मनोहर सावंत, मृणाल परब, विकास सावळ, सोनाली चेंदवणकर, डॉ.सातोस्कर, गिरप, हेमंत चव्हाण, प्रिती वाडकर, रुपाली दाभोलकर, सानिका पेडणेकर, सृष्टी गोरट, साक्षी गोरट, सिद्धी परब व मनस्वी दाभोलकर यांचे सहकार्य लाभले. प्रतिराज कुडपकर यांनी सूत्रसंचालन व आभार मानले. स्पर्धेचे आयोजन व्ही.जी.फिटनेस सेंटरचे संचालक वासुदेव गावडे यांनी सर्वांच्या सहकार्याने उत्कृष्टरित्या केले.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा