सिंधुदुर्गनगरी
तृतीयपंथी समाजाला शासनाकडून लाभ देण्यासाठी या समाजाचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. तरी तृतीयपंथींनी त्यांची वैयक्तिक, निवास, स्थलांतरण, शिक्षण विषयक माहिती, आवश्यक कागदपत्रे माहिती, कौटुंबिक व आर्थिक परिस्थिती, शासनाकडून लाभ मिळालेल्या योजना, आरोग्य या विषयीची माहिती सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, सिंधुदुर्ग येथे समक्ष भेट देऊन योजनेविषयी अर्ज व कागदपत्रे सादर करावीत असे आवाहन दीपक घाटे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, सिंधुदुर्ग यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी समाज कल्याण विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजिक न्याय भवन, सिंधुदुर्गनगरी, दूरध्वनी क्र. 02362-228882 येथे संपर्क साधावा.