कळसूत्री बाहुल्यांचे खेळ दाखविणाऱ्या जिल्ह्यातील सुपुत्रास पद्मश्री पुरस्कार जाहीर.

कळसूत्री बाहुल्यांचे खेळ दाखविणाऱ्या जिल्ह्यातील सुपुत्रास पद्मश्री पुरस्कार जाहीर.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील श्री परशुराम गंगावणे यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. कळसूत्री बाहुल्यांचे खेळ दाखविणाऱ्या पारंपरिक लोककलेला जिवंत ठेवणाऱ्या श्री परशुराम गंगावणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याने खऱ्या अर्थाने सरकारने लोककलेचा दिल्ली दरबारी सन्मान केला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कळसूत्री बाहुल्यांच्या खेळ प्रकारच्या लोककला आता दिल्लीच्या दरबारात सन्मानित होणार असल्याने जिल्हावासीयांची मान उंचावली असून प्रत्येक जिल्हावासीयांना आपल्या जिल्ह्यातील सुपुत्राचा अभिमान आहे. पारंपरिक लोककलेचा राष्ट्रीय सन्मान होणार असल्याने ही लोककला जपणारे पिंगुळी गावचे सुपुत्र श्री. परशुराम गंगावणे यांच्या कलेचे चीज झाले आहे. श्री.परशुराम गंगावणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याने सर्वच स्तरावरून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा