You are currently viewing शहीद मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या स्मरणार्थ गृहप्रवेशाचे औचित्य साधून आयोजित केलेले रक्तदान शिबिर सर्वत्र ठरतेय लक्ष वेधी

शहीद मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या स्मरणार्थ गृहप्रवेशाचे औचित्य साधून आयोजित केलेले रक्तदान शिबिर सर्वत्र ठरतेय लक्ष वेधी

ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांच्या सहित 21 जणांनी केले रक्तदान

*वैभववाडी

“प्रेरणादायी आदर्श तू अदम्य तुझ्या साहसाने।। कौतुक दाटे नयनांमध्ये। उन्नत माथा अभिमानाने।।” शहीद मेजर शहीद कौस्तुभ राणे यांच्या सडूरे- गावठणवाडी येथे घराच्या गृहप्रवेशानिमित्त आज शनिवार दि.२१ मे २०२२ रोजी रावराणे बंधु तसेच त्यांचा मित्रपरिवार आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान,सिंधुदुर्ग शाखा – वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सडुरे, गावठणवाडी ता. वैभववाडी येथे रक्तदान शिबिर पार पडले. यावेळी या रक्तदान शिबिरामध्ये २१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.गृहप्रवेशा दिवशी शहीद मेजर कौस्तुभ राणे यांची आठवण सर्वाना सदैव राहावी.यासाठी त्यांच्या स्मरणार्थ रक्तदान करणाऱ्यां रक्तदात्यांना यावेळी “स्मृती चषक” देण्यात आला
यावेळी शहीद मेजर कौस्तुभ राणे यांचे पिताश्री प्रकाश रावराणे व माजी सरपंच विजय रावराणे,ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे, सदानंद रावराणे व रावराणे कुटुंबातील सदस्य,, गावचे नागरीक तसेच सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे वैभववाडी तालुकाध्यक्ष राजेश पडवळ व रक्तदाते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − sixteen =