You are currently viewing मळगाव गावचे सुपुत्र संजय जोशी यांना उत्कृष्ठ रंगभूषाकार म्हणून द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर…

मळगाव गावचे सुपुत्र संजय जोशी यांना उत्कृष्ठ रंगभूषाकार म्हणून द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर…

हौशी राज्य नाट्य स्पर्धेतील तुका अभंग अभंग नाटकासाठी केली रंगभूषा….

सावंतवाडी

नुकत्याच पार पडलेल्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेत सादर झालेल्या सावंतवाडी येथील क्षितिज इव्हेंट निर्मित “तुका अभंग अभंग” या नाटकाची रंगभूषा करणाऱ्या मळगाव येथील रंगभूषाकार ‘संजय उर्फ अण्णा बापू जोशी’ यांना रंगभूषाकार म्हणून द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले असून, मळगाव गावच्या शिरपेचात आणखी एका कलाकाराने मानाचा तुरा रोवला आहे.

लवकरच मुंबई येथे सांस्कृतिक मंत्र्यांकडून त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी ते बोलताना म्हणाले की, आज मला प्राप्त झालेला पुरस्कार हा माझी ग्रामदेवता, गजानन, रांगदेवता यांचा कृपाशीर्वाद असून, आपल्या मातृ पितृ देवतेच्या आशीर्वादाने हा पुरस्कार आपणाला मिळाला आहे.

यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की, आपणाला दशावतारी कला खुप आवडतं असून, रंगभूषे सोबतच आपण अनेक दशावतारी कलाकार निर्माण केले आहेत. रंगभूषेचे ज्ञान आपणाला ज्येष्ठ रंगकर्मी कै. आंबा कोंड्ये आणि कै. केशव गोसावी यांच्याकडून घेतले असून, ज्येष्ठ दशावतारी कलाकार बाबुराव आसयेकर (मळगाव) आणि दत्ताराम नाईक (मळेवाड) यांच्याकडून दशावतारी कलेचे ज्ञान घेतले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा