You are currently viewing पाडलोस रवळनाथ भजन मंडळाचे उल्लेखनीय कार्य

पाडलोस रवळनाथ भजन मंडळाचे उल्लेखनीय कार्य

बांदा

सुरेल आवाजामुळे अल्पावधीत संगीत क्षेत्रात नावलौकिक कमावणारे सावंतवाडी तालुक्यातील पाडलोस मधील रवळनाथ प्रासादिक भजन मंडळाचे ख्यातनाम भजनी बुवा अजित गावडे यांनी अनेक भजन स्पर्धांत भाग घेऊन गावचे नावलौकिक केले. नुकताच मंडळाला सरमळे खुल्या भजन स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त झाला.

श्री देव रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ पाडलोसने झोळंबे भजन स्पर्धेत लक्षवेदी संघाचा मान पटकावला. माजगाव भजन स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक आणि उत्कृष्ट गायक तर बावळाट भजन स्पर्धेत उत्कृष्ट कोरस म्हणून आणि सरमळे भजन स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला. दरम्यान, अजित गावडे म्हणाले की आपण केवळ भजन करत नसून त्यामधून समाजप्रबोधनचे कार्य करतो. गावातील ग्रामस्थ व आपले भजनी सहकाऱ्यांमुळे अनेक स्पर्धांत यश मिळवले. भविष्यात मोठ्या स्पर्धांत भाग घेऊन आपली कला सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा