You are currently viewing बाप/तात

बाप/तात

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.अर्चना मायदेव यांची अप्रतिम अभंग रचना

तात माझे होते| शिक्षकी पेशाचे
मृदू स्वभावाचे| म्हणुनिया||१||

भजनाची गोडी| मृदंग वाजवी|
ज्ञानयाची ओवी |मुखी असे||२||

मुलांवर माया.| इतकीच केली|
नाही बिघडली| मुले कधी||३||

संसाराचा भार.| वाहिला तयांनी|
विठोबा चरणी.| सर्व काळ||४||

मुलांसाठी त्यांनी|. कष्ट केले फार|
फिरे ना माघार|. संकटात||५||

शिकवण्या केल्या| भजनी मंडळ|
छंद तो सकळ|. पूर्ण करी||६||

ऋण ते इतके| त्यांचे माझ्या वर|
नाही फिटणार.| किती जन्म||७||

लेक मी त्यांचीच| अभंग गाईन|
पुढे चालवीत| वसा त्यांचा||८||

सौ. अर्चना मायदेव
पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा