You are currently viewing मराठीची शिदोरी..

मराठीची शिदोरी..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री जयश्री जिवाजी कुलकर्णी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

मराठीची शिदोरी..

 

पालखी खांद्यावरी ही घेऊनी मी चालतो

या मराठीची शिदोरी मी जगाला वाटतो

 

मज अती अभिमान माझ्या मायबोलीचा असे

द्या खरा सन्मान तिजला मी तुम्हाला सांगतो

 

मी कवी आहे परंतू तीच देते प्रेरणा

बोट ना सोडिन तिचे मी माय तिजला मानतो

 

शब्द तू दिधले मला हे भाग्य माझे केवढे

त्याच शब्दातून पूजा आज येथे मांडतो

 

ज्यास ना ऐश्वर्य ठावे या मराठीचे मुळी

तो तिला त्या इंग्रजीच्या व्यर्थ कुबड्या लावतो

 

जयश्री जिवाजी कुलकर्णी

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven + eight =