You are currently viewing माणसे आणि रस्ते

माणसे आणि रस्ते

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य लेखक कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*

*माणसे आणि रस्ते*
**************
ओळखीचेच रस्ते
कधी कधी वाट चुकवतात
इथेतिथे पावले वळवतात
रस्ता संभ्रमात टाकतो
कुठेही भरकटत नेतो

आयुष्याच्या वाटेवरचही
असच असतं
रोज नवनवीन माणस
भेटतात
रस्ता चुकवतात
माणुस भरकटत जातो
माघारी येतो
तेव्हा माणसाची माती
झालेली असते

अनोळखी माणसे
आणि अनोळखी रस्ते
माहिती नसतं
कुठे घेवून जातील
वळण घेतल्यावर
एकटेच सोडून देतील

काही माणसे काही रस्ते
वाकडी असतात
काही माणसे काही रस्ते
सरळ सोपी नसतात
म्हणून माणसांची आणि रस्त्यांची
योग निवड केली की
वाट चुकत नाही
वळणे कितीही आलीत तरी
पावले भरकटत नाही

जगात दिशाभूल करणारी माणसं
आणि रस्ते खूप असतात
दिसतात तशी नसतात
कारण माणसे आणि रस्ते
कधीच एकसारखी रहात नाही
ते कायम बदलत असतात

असंख्य माणसे तशी
असंख्य वाटाही दिसतात
खाचखळगे पाहुन चालायच्या असतात
वळण आले की
गती सावकाश करायची
आपणच आपली दिशा ठरवायची

वरवर दिसणारी चांगली
माणसे काय नी रस्ते काय
त्याच्या मनातला हेतु
कळत नसतो
म्हणून माणुस फसतं असतो

तेव्हा रस्ता चांगला असला की
माणूस सुसाट धावतो
कुठल्याही वळणावरती
अपघात होत नसतो
म्हणून माणस पारखून घ्यायची
रस्ता विचारुन घ्ययचा

*संजय धनगव्हाळ*
९४२२८९२६१८

प्रतिक्रिया व्यक्त करा