You are currently viewing हायकू

हायकू

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम हायकू काव्यरचना*

 

*हायकू*

 

झाडे जगवा

गोष्टीत राहिलेली

चिऊ वाचवा।।🕊️🌳

 

अंगण सुने

टाकता दाणापाणी

नसे चिमणी।।🕊️

 

चिवचिवती

चिमण्या घरभर

नाद सुंदर।।🌳🕊️

 

उडते पाणी

पंख भिजवताना

खेळे चिमणी।।🕊️💦

 

दिसता चिऊ

बाळ छान हसतं

रडू मिटतं।।🕊️

 

कृत्रिम खोपा

चिमणीला वाचवा

जाग मानवा।।🌳🕊️

 

पुन्हा शिकू या

चिवचिव चिमणी

मधुर गाणी!!🕊️💦

 

🌳🕊️💦🌳🕊️💦🌳🕊️

 

अरूणा दुद्दलवार@✒️

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × five =