You are currently viewing कधीही हाक मारा .. आम्ही पाठीशी

कधीही हाक मारा .. आम्ही पाठीशी

केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांनी केले पालेकर कुटुंबाचे सांत्वन

सावंतवाडी

बाळा हा आमचा सच्चा कार्यकर्ता होता. त्याचं अकाली जाणं वेदनादायी आहे. तुम्ही स्वतःला सावरा. कधीही हाक मारा. आम्ही सदैव पाठीशी आहोत, अशा शब्दात केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांनी पालेकर कुटुंबाचं सांत्वन केलं.

भाजपचे सावंतवाडी प्रभारी तथा आंबोलीचे सरपंच गजानन उर्फ बाळा पालेकर यांचे रविवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते. या पार्श्‍वभूमीवर भाजपचे जेष्ठ नेते केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे व सौ. निलम राणे यांनी आंबोलीत जाऊन पालेकर कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. बाळा पालेकर यांचे बंधू माजी जि. प. सभापती आत्माराम पालेकर, पत्नी, मुलगा अवधुत, मूली अश्विनी आणि अंकिता, संतोष पालेकर व अन्य कुटुंबियांना त्यांनी धीर दिला.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा बँक संचालक तथा भाजपचे जिल्हा चिटणीस महेश सारंग, सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, न.प.चे माजी माजी सुधीर आडिवरेकर, ॲड. परिमल नाईक, उदय नाईक, माजी नगरसेवक आनंद नेवगी, आंबोली उपसरपंच दत्तू नार्वेकर, सोसायटी चेअरमन शशिकांत गावडे, उपाध्यक्ष महादेव गावडे, हेमंत बांदेकर, बाळा सावंत, प्रकाश गावडे, दिलीप सावंत, अनंत गावडे, नमिता राऊत, महेश पावसकर, चंद्रकांत गावडे, संदीप गावडे आदी उपस्थित होते.
आपण १२ दिवसानंतर परत येणार आहे. बाळा गेल्याचं दुःख आहे. त्याच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून येणार नाही. मात्र, तुम्ही सर्वांनी धीर धरा. गावात एकजूट राहील यासाठी प्रयत्न करा, मी तुमच्या सदैव पाठीशी आहे, अशा शब्दात नामदार नारायण राणे यांनी गावातील उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाही धीर दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा