You are currently viewing कारिवडे-गोसावी टेंब येथे सिद्ध महापुरुष समाधी मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात…

कारिवडे-गोसावी टेंब येथे सिद्ध महापुरुष समाधी मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात…

भैरीनाथाच्या मंदिराचा प्राण प्रतिष्ठापन सोहळाही संपन्न; विविध मान्यवरांची उपस्थिती…

सावंतवाडी

कारिवडे-गोसावी टेंब येथील सिद्ध महापुरुष समाधी मंदिराचा वर्धापन दिन व भैरीनाथाच्या मंदिराचा प्राण प्रतिष्ठापन सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी सिद्ध महापुरुष सेवा मंडळ कारिवडे यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला खासदार विनायक राऊत यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

यात माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, देव्या सूर्याजी ,सुरेश भोगटे, सीताराम गावडे, बाबा गावकर, दादा गावकर, संजय पिळणकर, ॲड. श्रीधर पराडकर, कांता कोडियालविनायक कोडियाल , सुधीर पराडकर, जावेद शेख आदींना सन्मानित करण्यात आले.

सिद्ध महापुरुष समाधी मंदिर हे कैक वर्षांचे जागृत देवस्थान आहे. नाथ संप्रदायातील सत्पुरूषाने आपली सिद्धता सिद्ध करून जिवंत समाधी त्या ठिकाणी घेतली होती. त्यामुळे त्या मंदिराला सिद्ध महापुरुष असे नाव पडले होते. संबंधित देवस्थान नाथ संप्रदायातील व जागृत असल्याने भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी असते. नवसाला पावणारा हाकेला धावणारा, असा सिद्ध महापुरुष असा नावलौकिक या देवस्थानचा आहे.

कार्यक्रमाचे आयोजन बाबनाथ गोसावी, बाबुराव गोसावी, विष्णू गोसावी, दिवाकर गोसावी, सिद्धेश गोसावी, सागर गोसावी, दीपक गोसावी ,सिद्धनाथ गोसावी, एकनाथ गोसावी ,बाबा गोसावी, व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 5 =