You are currently viewing प्रलंबित शेती कृषी कनेक्शन साठी निधी देणे बाबत सतीश सावंत यांनी केली मागणी..

प्रलंबित शेती कृषी कनेक्शन साठी निधी देणे बाबत सतीश सावंत यांनी केली मागणी..

सिंधुदूर्ग :

जिल्ह्यातील प्रलंबित शेती कृषी कनेक्शन साठी जिल्हा नियोजन मधून निधी देण्याची मागणी माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे आज केली. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी ली., कडे देवगड, कणकवली, मालवण तालुक्यातील नवीन शेती कृषी कनेक्शन मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत. नवीन शेती कृषी कनेक्शन साठी ४२ लाख निधीची आवश्यकता आहे. MSEB कडे कृषी आकस्मिक निधी (SEF FUND) पुरेशा प्रमाणात नसल्यामुळे शेतीची कृषी कनेक्शन प्रलंबित राहतात. त्यासाठी जिल्हा नियोजन निधी म्हणून खास बाब म्हणून निधी देण्याची पालकमंत्री उदय सामंत यांनी आदेश दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा