You are currently viewing केंद्रशाळा शेर्पेमध्ये विद्यार्थी खाद्यजत्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

केंद्रशाळा शेर्पेमध्ये विद्यार्थी खाद्यजत्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

*केंद्रशाळा शेर्पेमध्ये विद्यार्थी खाद्यजत्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद*

कणकवली

केंद्रशाळा शेर्पेमध्ये विद्यार्थ्यांना खाद्यपदार्थ माहिती , उद्योगप्रियता वाढ व खरी कमाई याचा आनंद मिळावा याकरिता खाद्य जत्रेचे आयोजन करण्यात आलेले होते .शाळेतील विद्यार्थ्यांचे ११ गटामध्ये विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आलेले होते .पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि विद्यार्थ्यांची मेहनत यामुळे हा उपक्रम अतिशय नियोजन बंद संपन्न झाला .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रवींद्र जठार माजी सभापती वित्त बांधकाम समिती सिंधुदुर्ग हे होते ‘तर प्रमुख उपस्थिती म्हणून स्मिता पांचाळ -सरपंच शेर्पे, संतोष ब्रह्मदंडे -सरपंच कुरंगवणे -बेर्ले ,सिराज मुजावर -उपसरपंच शेर्पे बबलू पवार – उपसरपंच कुरंगवणे ,केंद्रप्रमुख -संजय पवार ,ग्रामपंचायत सदस्य -शितल कांबळे माजी सरपंच शेर्पे – निशा गुरव ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष – सत्यविजय शेलार मुख्याध्यापक -दशरथ शिंगारे ,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य – विलास पांचाळ ,मंगेश कांबळे व शाळेचे माजी शिक्षक अमोल भंडारी आदी उपस्थित होते .
केंद्रशाळा शेर्पे मध्ये आयोजित केलेला खाद्य जत्रा महोत्सव हा विद्यार्थी यांच्यासाठी आनंद निर्माण करणारा आणि रोजगार जिज्ञासा वाढवणारा असा आहे . पालकांनी सुद्धा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिलेला आहे . केंद्रशाळा शेर्पेचे विद्यार्थी, शिक्षक , पालक अशा प्रकारचे समन्वयाने अतिशय चांगल्या प्रकारचे कार्यक्रम संपन्न करत आहेत त्यामुळे ते कौतुकास पात्र आहेत अशा प्रकारचे गौरवोद्गार कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र जठार यांनी काढले .तसेच कार्यक्रमा संदर्भात प्रथमेश शेलार ,संजय पवार, निशा गुरव ,संतोष ब्रह्मदंडे, स्मिता पांचाळ यांनी सुद्धा मनोगते व्यक्त केली .
केंद्रशाळा शेर्पे चे माजी शिक्षक अमोल भंडारी यांची सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याने त्यांचा सुद्धा सत्कार समारंभ शाळेमध्ये आयोजित करण्यात आलेला होता .
सन २०२३ -२०२४ या शैक्षणिक वर्षाभरामध्ये शालेय स्तरावर घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते श्री काळेश्वरी नवतरुण मित्र मंडळ शेर्पे पाटीलवाडी ,प्रकाश बळीराम सावंत ,सविता विश्वनाथ शेलार व राजू विश्वनाथ शेलार यांच्या देणगीतील व्याजातून विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले .
महिलांसाठी रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते .प्रथम -निशा भास्कर गुरव ‘द्वितीय -सिद्धी सत्यविचय शेलार, तृतीय – सानिका देवेंद्र शेलार व उत्तेजनार्थ – लता पांचाळ अशाप्रकारे रांगोळी स्पर्धेला सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला .
रांगोळी स्पर्धा व फनी गेम स्पर्धेच्या आयोजनाकरिता शिक्षिका मोहिनी पाटील व कविता हरकुळकर यांनी विशेष मेहनत घेतली .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंगेश कांबळे ,शुभम कांबळे , अमान रमदुल या माजी विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य लाभले .तसेच शाळेचे सर्व पालक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक वृंद यांचे विशेष सहकार्य लाभले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दशरथ शिंगारे यांनी तर सूत्रसंचालन अमरीन शेख यांनी केले .

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा