You are currently viewing महाराष्ट्र राज्य रस्सीखेच निवड चाचणी स्पर्धेत सिंधुदुर्ग संघ प्रथम

महाराष्ट्र राज्य रस्सीखेच निवड चाचणी स्पर्धेत सिंधुदुर्ग संघ प्रथम

शुभ्रा स्पोर्ट्स तुळस संघाने पटकावले विजेतेपद

 

सावंतवाडी :

पालघर येथे पार पडलेल्या २३ व्या सिनियर महाराष्ट्र स्टेट चॅम्पियनशिप २०२२-२३ राज्य रस्सीखेच निवडचाचणी स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केलेल्या शुभ्रा स्पोर्ट्स तुळस संघाने विजेते पद पटकावून सिंधुदुर्ग जिल्हा व तुळस गावाचा किर्तिध्वज राज्यभर फडकवला.

उद्या शुक्रवारी राज्यविजेता शुभ्रा स्पोर्ट्स संघाचे सावंतवाडी येथे आगमन होणार आहे. त्या निमित्ताने विजेत्या संघाच्या स्वागतासाठी सावंतवाडी रेल्वस्थानकापासून तुळस जैतीर मंदिरपर्यंत स्वागत रॅली चे आयोजन करण्यात आले आहे. रॅली सावंतवाडी रेल्वस्थानकापासून क्षेत्रपालेश्वर मंदिर होडवडा ते तुळस जैतीर मंदिर असणार आहे. रॅली साठी सिंधुदुर्ग जिल्हा रस्सीखेच संघटनेचे पदाधिकारी तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. विजेत्या संघाच्या स्वागत रॅली साठी तुळस गावातील नागरिकांनी सकाळी ९ वाजता सावंतवाडी रेल्वेस्थानकावर उपस्थित राहावे असे आवाहन तुळस सरपंच शंकर घारे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा