You are currently viewing व्हॉलीबॉल प्रशिक्षण शिबीर निवडचाचणी 20 रोजी

व्हॉलीबॉल प्रशिक्षण शिबीर निवडचाचणी 20 रोजी

व्हॉलीबॉल प्रशिक्षण शिबीर निवडचाचणी 20 रोजी

सिंधुदुर्गनगरी 

व्हॉलीबॉल खेळ व खेळाडू यांच्या भविष्याचा विचार करून खेळाडू शोध प्रक्रियेतून 16 वर्षाखालील मुलींसाठी 20 दिवसाच्या प्रशिक्षण शिबीराचे आयोजन शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे आयोजन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षण शिबीरासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एकूण 5 खेळाडू (मुली) यांची निवड केली जाणार आहे. अटींची पूर्तता करत असलेल्या खेळाडूंनी प्रशिक्षण शिबीराच्या निवडचाचणीसाठी जिल्हा क्रीडा संकुल, येथे 20 मे 2022 रोजी सकाळी 9 वाजता उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे.

          या प्रशिक्षण शिबीरासाठी तामिळनाडूचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक पी. सी. पांडियन मार्गदर्शन करणार आहेत. निवड चाचणीसाठी खेळाडूचे वय दि. 1 जानेवारी 2023 रोजी 16 वर्षाखालील असावा, उंची 175 सेंमी असावी. व्हॉलीबॉल खेळातील कौशल्यप्राप्त खेळाडूनी आधार कार्ड, जन्मतारीख दाखला इत्यादी कागदपत्रे घेऊन प्रशिक्षण शिबिराच्या निवडचाचणीस उपस्थित रहावे असे आवाहन ही श्रीमती शिरस यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा