You are currently viewing माझा स्वामीराया..

माझा स्वामीराया..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य पत्रकार लेखक कवी सागर बाणदार यांची अप्रतिम भक्तिरचना*

*माझा स्वामीराया…*

निराधारांचा तू खरा आधार
असा माझा हा स्वामीराया,
नुसता घेता मुखाने नाम
सहजच दूर करती मोहमाया…

मुखात असता सदा स्वामीनाम
मग भय कशाचेच नसते,
तुझी अपरंपार अगाध लिला
भक्तीत लीन होता कळते…

भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी
किती देसी माझ्या मनाला धीर,
तूच होसी सकलजणांची मायमाऊली
तुझ्याच भरवशावर मन होई खंबीर…

तुझाच बोट धरुनी चालतो
नको आता अन्य काहीच,
माझे दैवत स्वामीराया समर्थ
मनात शल्य नसे कशाचेच…

रचना…..
@ सागर बाणदार,
मु.पो. इचलकरंजी
मो.8855915440

प्रतिक्रिया व्यक्त करा