You are currently viewing भुजंगप्रयात

भुजंगप्रयात

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच… गझल प्रावीण्य… गझल मंथन समूह सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.शोभा वागळे यांची अप्रतिम गझल रचना*

वृत्त:-भुजंगप्रयात

कसा आज ठेऊ भरवसा तुझ्यावर
तुझे वागणे जर ठसेना मनावर

गुन्हेगार आधी कशाला धरावे
उगीचच सजा का खरे समजल्यावर

कशाला उगाळू जुन्या आठवांना
उगी भार आता नको जीवनावर

अशी रात्र हसली नभी चांदण्याची
सख्या प्रीत फुलली तुझी चेहऱ्यावर

सदा बाप झटतो मुलांच्याच साठी
तरी भार नसतो कधी तो मुलांवर.

शोभा वागळे
मुंबई.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − thirteen =