You are currently viewing वर्षाच्या ओळ्या सरीत

वर्षाच्या ओळ्या सरीत

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य लेखक कवी बी. डी. घरत लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*⛈️वर्षाच्या ओळ्या सरीत..*

🦚🐸🌳🫧☔⚡

 

दाटताची घणे मेघ अंबरी

लक्ष सा-यांचेच ते वेधती

पडता थेंब थेंब वर्षा सरी

पक्षी मंजूळ गीत ते गाती

 

पुसोणिया क्षितीज सिमा

झोकोणी सारंची आकाश

नबाळगता कशाची..तमा

न्हावलं पावसानं सा-यास

 

अदृश्य पवन सोबती गडी

दृश्य वर्षासंग प्रणयक्रिडा

लखलखत्या विज उजेडी

चाले तयांचा नृत्य भांगडा

 

गिरीच्या हिरव्या शाळूवरी

मारोनी शिंपड गार पाणी

विसावोनी तया डोंगरदरी

सुखावती दोघं राजाराणी

 

वर्षाच्या ओळ्याची सरीत

सारे चींबचींब होऊन गेले

नंअवनीच्या शांत कुशीत

शिरोणिया मंत्रमुग्ध झाले

 

वाढताच वर्षाचा महा जोर

ओसांडता वर्षाचा महापूर

नाचू लागोणी मोर लांडोर

संपे बळीराजाचं दुःख घोर

 

🐸🌳⛈️बी.डी.घरत

खारकोपर/पनवेल/रायगड

✍️🕺🌈🌍☔💃🪿

प्रतिक्रिया व्यक्त करा