You are currently viewing ज्येष्ठ पत्रकार अण्णा देसाई यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार अण्णा देसाई यांचे निधन

वेंगुर्ला

जेष्ठ पत्रकार द.ना. तथा अण्णा देसाई यांचे ८५ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.दै.गोमंतक, दै.रत्नागिरी टाईम्स, दै. सागर, दै सिंधुदुर्ग समाचार या वृत्तपत्रात काम केले. देसाई कुटुंबियांच्या ‘कोकण दिप प्रकाशन‘चे संपादक म्हणून काम करीत असताना परुळे भागात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उभारणीत त्यांचा मौल्यवान सहभाग होता.

गाय वासरू काँग्रेसचे निवडणूक चिन्ह असल्या पासून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून परुळेतील अनेक विकास कामे त्याकाळी करण्यात योगदान होते. परूळे हे एक संघ गाव असताना परूळे ग्रामपंचायतचे सदस्य पदही भुषविले होते. परूळे गावातून मुंबईसाठी कर्ली -भोगवे मुंबई अशी पहीली एस टी सेवा ही त्यांनी सुरू केली होती.

तरूण भारत चे पत्रकार भूषण देसाई व उद्योजक किरण देसाई यांचे ते वडील होत. कुडाळ पत्रकार संघाचा मानाचा पत्रकारितेतील कै. भय्या साहेब वालावलकर पुरस्कार ही त्यांना देऊन गौरवण्यात आले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा