You are currently viewing जागतिक शौचालय दिनानिमित्त विशेष अभियान…..

जागतिक शौचालय दिनानिमित्त विशेष अभियान…..

सिंधुदुर्गनगरी

स्वच्छ भारत मिशन ( ग्रामिण )च्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत जागतिक शौचालय दिनानिमित्त दिनांक 17 ते 27 नोव्हेंबर 2020 या कालावधीत विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील हागणदापीमुक्त झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छतेचे सातत्य कायम राहण्यासाठी तसेच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, वैयक्तिक शौचालय उपबल्धता, सार्वजनिक शौचालयांची उपलब्धता व निधीचे वाटप, शाळा व अंगणवाडींमधील शौचालयांच्या देखभाल दुरुस्तीवर विशेष भर देऊन उपलब्ध शौचालयांचा शाश्वत वापर होण्याच्या दृष्टीने जनजागृती करण्यात येणार आहे.

   तसेच या अभियानामध्ये सार्वजनिक शौचालयांमध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध करणे, सार्वजनिक शौचालयांना वीज जोडणी उपलब्ध करून देणे, सार्वजनिक शौचालय परिसरात स्वच्छता करणे, कुटुंबस्तरावर शौचालयांच्या परिसराची स्वच्छता आणि सुशोभिकरण, नादुरुस्त सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती, ग्रामपंचायत कार्यालयातील नादुरुस्त शौचालयांची दुरुस्ती, शाळा, अंगणवाडीतील नादुरुस्त शौचालयांची दुरुस्ती, वैयक्तिक शैचालयांचे बांधकाम व प्रोत्साहन अनुदान वाटप करणे, शाळा व अंगणवाडी येथील शौचालयांच्या देखभाल दुरुस्तीवर विशेष भर देऊन उपलब्ध शैचालयांचा शाश्वत वापर होण्याच्या दृष्टीने जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × four =