You are currently viewing उर्दू शाळांमधील वर्गवाढ संदर्भात केलेल्या प्रयत्नांना यश

उर्दू शाळांमधील वर्गवाढ संदर्भात केलेल्या प्रयत्नांना यश

समीर जमादार यांची माहिती

इचलकरंजी (प्रतिनिधी)
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग पश्‍चिम महाराष्ट्र यांच्यावतीने उर्दू शाळांमधील वर्गवाढ संदर्भात केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. इचलकरंजी नगरपरिषदेचे तत्कालीन प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांनी मागील महिन्यात सरहद्द गांधी खान अब्दुलगफार खान न.पा. शाळा क्र. 46 व डॉ. बाबासाहेब आंबेडकर न.पा. शाळा क्र. 3 या दोन शाळांचे प्रस्ताव शिक्षण संचलनालय पुणेचे उपसंचालक (प्राथमिक) यांच्याकडे पाठविला असल्याची माहिती
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग पश्‍चिम महाराष्ट्र सरचिटणीस समीर जमादार यांनी दिली.

अल्पसंख्याक समाजातील मुला-मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग पश्‍चिम महाराष्ट्राचे सरचिटणीस समीर जमादार व तालुका युवक काँग्रेस माजी सरचिटणीस ताजुद्दीन खतीब यांनी सुचना केल्यानुसार जेथे 7 वी पर्यंत शाळा आहेत अशा शिक्षण संस्थेमधील शाळाचे 8 वी ते 12 वी पर्यंतचे वर्गवाढ करणेबाबत अभ्यास करून प्रस्ताव सादर करणेचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. या संदर्भात त्यांनी जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा सुरु केला होता. जिल्हा परीषदेच्या अखत्यारित्या 58 उर्दु शाळा सुरू असून या शाळामध्ये इ. 1 ली ते 5 वी 3240, इ. 6 वी ते 8 वी 1108 असे एकुण 4348 मुले-मुली शिक्षण घेत आहेत. या शाळांचा सर्व्हे करून योग्य त्या उर्दू शाळासंदर्भात 8 वी ते 12 वी पर्यंत वर्ग वाढीसाठी तात्काळ प्रस्ताव तयार करून पाठविण्यात यावेत, अशी मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील 58 उर्दू शाळांपैकी 37 शाळांना 5 किलोमीटर परिसरात उर्दू माध्यमिक शाळा उपलब्ध आहेत. उर्वरीत 21 शाळांपैकी 7 शाळांमध्ये वर्गवाढ करण्याबाबतच्या प्रस्तावांना छाननी अंती मंजूरी देण्यात आली आहे. त्यामध्ये गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी व कागल तालुक्यातील सागांव या प्रत्येकी 1, हातकणंगले तालुक्यातील हातकणंगले, माणगांव, हेर्ले या 3 व शिरोळ तालुक्यातील जनसेवा व घोसरवाड येथील 2 या उर्दू शाळांचा समावेश आहे. परंतु, इचलकरंजीतील उर्दू शाळांचा एकही प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आलेला नव्हता. त्याच्या पाठपुराव्याला यश आले असून नगरपरिषदेच्या सरहद्द गांधी खान अब्दुलगफार खान न.पा. शाळा क्र. 46 व डॉ. बाबासाहेब आंबेडकर न.पा. शाळा क्र. 3 या दोन शाळांचे इयत्ता 8 वी ते 12 वी वर्गवाढीचा प्रस्ताव पाठविण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग पश्‍चिम महाराष्ट्र सरचिटणीस
समीर जमादार व ताजुद्दीन खतीब यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight − seven =