नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आज मांगवली येथे भव्य रक्तदान शिबिर…

नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आज मांगवली येथे भव्य रक्तदान शिबिर…

वैभववाडी

माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मांगवली येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सुवर्ण सिंधू पंचगव्य चिकित्सा केंद्र, ग्रामपंचायत मांगवली व सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरातील रक्तदात्यांना प्रोत्साहन म्हणून लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. दरम्यान भाग्यवान विजेत्याला दोन हेल्मेट व एक ईअर फोन ब्लूटूथ देण्यात येणार आहे. तसेच सर्व सहभागी दात्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या शिबिरात सहभागी होणाऱ्या नागरिकांनी 7057544643 या नंबर वरती संपर्क साधावा. या रक्तदान शिबिरात युवा पिढीने सहभागी व्हावे. असे आवाहन सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू पडवळ, सरपंच सुवर्णा लोकम व सुवर्ण सिंधूचे अध्यक्ष सतीश जागुष्टे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा