You are currently viewing कणकवलीत ३ मोटारसायकलला लागली आग

कणकवलीत ३ मोटारसायकलला लागली आग

कणकवली​ ​:​ ​
कणकवली नागवे रोड येथे ढेकणे घरा जवळ,​ ​रस्त्यालगत ​उभ्या केलेल्या ३ मोटारसायकल गाड्यांना बुधवार दिनांक ९ तारीखला पहाटे ३ च्या ​दरम्याने आग लावल्याची घटना घडली. यात २ मोटारसायकल जळून खाक झाल्या तर १ मोटारसायकल ढेकणे यांनी पाणी मारून वि​झवण्याचे प्रयत्न केल्याने बचावली. ​स्थानिकांच्या प्रसंगावधानातून ती मोटारसायकल वाचली​.​ एक मोटार सायकल किरकोळ ​जळाली आहे​.​
त्यामध्ये पांडुरंग पवार यांची डिस्कवर, मोहिते ​यांची ​प्ले​जर,​ ​पाताडे यांची​​ पॅसिनो​ ​​अशा प्रकारच्या गाड्या असून ही आग बुधवार दिनांक ९ तारीखला पहाटे ३ च्या ​दरम्याने लागली​,​ की लावली गेली ​असा संशय व्यक्त होत आहे​. ​ ​कारण गाड्या उभ्या असलेल्या समोरील निमनकर यां​च्या घराला बाहेरून कडी घालण्यात ​आली होती​,​ असे ​त्यांनी सांगितले​.​ त्यामुळे ​गाड्यांना आग लाव​ते​ ​वेळी कोणी बाहेर येऊन आपला प्लॅन फसू नये या उद्देशाने कडी लावली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे​. ​ पोलीस पहाटेच घटनास्थळी येऊन पाहणी करून गेले. पुढील तपास पोलीस करत असुन अशी आगीची घटना कणकवलीत घडल्याने कणकवलीत भीतीचे वातावरण निर्माण झाले​ आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen + 14 =