You are currently viewing शुटींग, सायकलींग व ॲथलेटिक्स खेळाची निवड चाचणी 30 व 31 रोजी

शुटींग, सायकलींग व ॲथलेटिक्स खेळाची निवड चाचणी 30 व 31 रोजी

सिंधुदुर्गनगरी 

शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे -बालवाडी,पुणे येथे ॲथलेटीक्स, शुटींग व सायकलींग या तीन खेळांचे राज्य निपुणता केंद्र कार्यान्वीत करण्यात आले आहे. खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्रा अंतर्गत शुटींग, सायकलींग व ॲथलेटिक्स खेळाच्या निवड चाचणी दि. 30 व 31 मे 2022 रोजी घेण्यात येणार असून त्यासाठी खेळाडूचे अर्ज मागविण्यात येत आहेत.

          ॲथलेटिक्स 21 वर्ष खालील मुले, मुली (18 खेळाडू), शुटींग – 19 वर्ष खालील मुले , मुली (24 खेळाडू), सायकलींग -12 ते 14 वर्ष खालील मुले, मुली (14 खेळाडू) खेळाडूंची संबंधित चाचणी तज्ञ समिती मार्फत घेऊन गुणानुक्रमे प्रवेश निश्चीत केला जाणार आहे.

खेळानिहाय निवड प्रक्रिया व नियम पुढीलप्रमाणे आहेत.

          सायकलींग व ॲथलेटिक्स खेळाचे राज्य स्तरावर प्राविण्यप्राप्त किंवा राष्ट्रीय स्तर सहभाग, प्राविण्य प्राप्त खेळाडूच निवड चाचणीसाठी पात्र असतील.खेळाडुंनी दिनांक 23 मे 2022 रोजी पर्यंत माहिती अर्ज kiscepune@gmail.cpm या ईमेल वर पाठवावेत. शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे – बालेवाडी, पुणे येथै आवश्यकतेनुसार फक्त खेळाडूंची निवासाची व्यवस्था करण्यात येणार असून प्रवास व भोजन खर्च स्वखर्चाने करण्यात यावा, चाचणीस येताना खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा प्राविण्य प्रमाणपत्रांची व शैक्षणिक कागदपत्रांची छायांकित प्रत मुळ प्रत सोबत आणावी. चाचणीस येताना खेळाडूंनी जन्मतारखेची नोंद असलेल्या शाळेच्या जनरल रजिस्टरची छायांकित प्रत सोबत आणावी. अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी मनिषा पाटील 7588461688 या दुरध्वनी वर संपर्क साधावा. तरी जिल्हयातील जास्तीत जास्त खेळाडूनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन  जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती शिरस यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा