You are currently viewing हायवेवरील गतिरोधकाने घेतला महिलेचा बळी!

हायवेवरील गतिरोधकाने घेतला महिलेचा बळी!

कणकवली

मुंबई-गोवा महामार्गावर नांदगाव तिट्यावरील उड्डाणपुलावर देवगडकडे जाणाऱ्या मार्गाच्या ठिकाणी महामार्ग प्राधिकरण कडून अचानक गतिरोधक बसविण्यात आले आहेत. आज दुपारनंतर कोणतेही पट्टे किंवा सूचनाफलक न लावता हे गतिरोधक करण्यात आल्यामुळे दुचाकीचा अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेली मसुरे येथील महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.हा अपघात रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघाताला जबाबदार कोण ?असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.जोपर्यंत गतिरोधक काढत नाही,तोपर्यंत रास्तारोको करण्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे व पोलीस दाखल झाले आहेत.मृतदेह अपघात स्थळी आहे,ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली आहे.महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना जाब विचारला जात आहे. सदर महिला लग्नानिमित्त कासार्डे येथे जात होती. रात्री उशिरापर्यंत रास्तारोको सुरूच होता. यामुळे मोठया प्रमाणात वाहने महामार्ग व सर्व्हीस रोडवर अडकून पडली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा