You are currently viewing केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कणकवलीत कार्यकर्त्यांचा जल्लोष…

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कणकवलीत कार्यकर्त्यांचा जल्लोष…

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कणकवलीत कार्यकर्त्यांचा जल्लोष…

कणकवली

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाली. राणेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर येथील आप्पासाहेब पटवर्धन चौकात भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. राणे यांच्या समर्थनाथ घोषणाबाजी देत परिसर दणाणून सोडला.

यावेळी माजी जि. प. अध्यक्ष संजना सावंत, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, मेघा गांगण, जिल्हा बँकेचे संचालक विठ्ठल देसाई, अ‍ॅड. समीर सावंत, माजी नगरसेवक शिशीर परुळेकर, भाजपचे शहराध्यक्ष अण्णा कोदे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, माजी पंचायत समिती सदस्य महेश लाड, कलमठचे उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, कळसुली सरपंच सचिन पारधिये, आशियचे सरपंच महेश गुरव, साकेडी उपसरपंच प्रज्वल वर्दम, शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद मसुरकर, परशुराम झगडे, निखिल आचरेकर, दत्ता काटे, सुशील पारकर, सुभाष मालंडकर, अमजद शेख, राजा पाटकर, नवू झेमणे, तेजस लोकरे, कलमठ ग्रा. पं. सदस्य पप्पू यादव, श्रेयश चिंदरकर, बाबू घाडीगावकर, राजू हिर्लेकर, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. ‘नारायण राणे तुम्ह आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘हमारा नेता कैसा हो नारायण राणे जैसा हो’, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजय असो’ अशी घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी करत परिसर दणाणून सोडला.
महायुतीकडून नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाली. याचा कार्यकर्त्यांना आनंद झाला असून त्यांना निवडून आणण्यासाठी महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले असून त्यांना अडीच लाखांच्या मताधिक्यांनी निवडून आणू, असा संकल्प केल्याचे समीर नलावडे, संजना सावंत, मेघा गांगण, प्रमोद मसुकर यांनी सांगितले.
दरम्यान, नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राणे आपल्या मुळगावी वरवडे रवाना झाले. एसटी बसस्थानक येथे राणेंचे आगमन होताच त्यांचे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी स्वागत केले. यावेळी माजी जि. प. अध्यक्ष संजना सावंत, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, मेघा गांगण, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, जिल्हा बँकेचे संचालक विठ्ठल देसाई, समीर सावंत, संदीप मेस्त्री यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ‘नारायण राणे तुम्ह आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशी घोषणाबाजी करत फटक्यांची आतषबाजी केली.

WhatsApp Facebook

प्रतिक्रिया व्यक्त करा