You are currently viewing भाजपच्या घोटगे ग्रामपंचायत सदस्या भाविका धुरी यांचा आ.वैभव नाईक,सतीश सावंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

भाजपच्या घोटगे ग्रामपंचायत सदस्या भाविका धुरी यांचा आ.वैभव नाईक,सतीश सावंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

कणकवली

 

घोटगे टेंबवाडी येथील भाजपच्या ग्रामपंचायत सदस्या भाविका धुरी यांच्यासह टेंबवाडी येथील ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आज प्रवेश केला. कणकवली विजय भवन येथे झालेल्या या प्रवेशावेळी आ. वैभव नाईक, सतीश सावंत यांनी शिवबंधन बांधून प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले.


यामध्ये घोटगे टेंबवाडी येथील भास्कर धुरी, रमाकांत गवाणकर, भालचंद्र नेरुरकर, सुहास नेरुरकर, सुप्रिया नेरुरकर, रुचिता गवाणकर आदींनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला.
यावेळी घोटगे शाखा प्रमुख चंदन ढवळ, घोटगे उपसरपंच गीतेश सावंत, युवासेना विभागप्रमुख निशांत तेरसे,अवि नाईक, मुंबई शाखा प्रमुख अशोक नेरुरकर, गणेश शिंदे मिलिंद आईर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा