You are currently viewing शिरोडा येथे भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर’

शिरोडा येथे भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर’

वेंगुर्ला :

 

शिरोडा ग्रामपंचायत आणि व्हिजन आय प्लस, शिरोडा यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर ग्रामपंचायत हॉल, शिरोडा येथे रविवार दिनांक १४ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत होणार आहे.

या शिबिरात अनुभवी नेत्र चिकित्सक, कॉम्प्युटर द्वारे नेत्र तपासणी, मोतीबिंदू तपासणी आयोजन केले आहे. तरी गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९७६५९११२४८ संपर्क साधावा.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा