You are currently viewing ओरोस सावंतवाडा येथे भवानी मातेचा गोंधळ

ओरोस सावंतवाडा येथे भवानी मातेचा गोंधळ

कुडाळ:

 

ओरोस येथील श्री देवी भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ उत्सव आज १७ मे रोजी साजरा होत आहे. या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी आठ वाजता अभिषेक, ९:३० वाजता महाआरती, सायंकाळी सहा वाजता जोगवा मागणे, ७:३० वाजल्यापासून महाप्रसाद रात्री १० वाजता देवीचा मांड भरणे, १०:३० पासून देवीचा जागर (गोंधळ). तर दुसऱ्या दिवशी सांगता आदी कार्यक्रम होणार आहेत. १९ मे रोजी सुलोचना नगर ओरोस येथील श्री देव ब्राह्मण देवी चा मंदिर येथे सायंकाळी ४:३० वाजता सत्यनारायण पूजा होणार आहे.

 

गोंधळ व सत्यनारायण पूजा सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन ओरोस येथील सावंत कुटुंबीय व समस्त रहिवासी यांनी केले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा