You are currently viewing कोल्हापूर येथे कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांस मोफत जेवण व्यवस्था.

कोल्हापूर येथे कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांस मोफत जेवण व्यवस्था.

माजी आरोग्य सभापती अड. परिमल नाईक यांचा पुढाकार

कोरोनाच्या संकटांशी दोन हात करत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बरेच रुग्ण गंभीर अवस्थेत कोल्हापूर येथे उपचार घेत आहेत. उपचार घेणाऱ्या रुग्णांना रुग्णालयांमार्फत जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे, परंतु रुग्णासोबत असणाऱ्या नातेवाईकांस मात्र बऱ्याचदा उपाशी राहण्याची वेळ येते.
शासनाच्या निर्देशाने हॉटेल्स व बाजारपेठा मर्यादित वेळेतच सुरू आहेत, त्यामुळे रुग्णांसोबत असणाऱ्या नातेवाईकांना बाजारपेठेत नाश्ता, जेवण मिळणे मुश्किल झाले आहे. कित्येकदा हे नातेवाईक उपाशीपोटीच राहतात. सावंतवाडीचे नगरसेवक, माजी आरोग्य सभापती तथा वकील श्री परिमल नाईक यांच्या सदर बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोल्हापूर येथे दाखल असणाऱ्या रुग्णांना मोफत जेवणाची व्यवस्था करण्याची तयारी दाखवत गरजवंतांना भाजपा जिल्हा व्यापारी आघाडी कोल्हापूरचे श्री.संतोष (आप्पा) लाड यांच्या किव्हा आपल्या स्वतःच्या नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
खालील मोबाईल नंबर वर संपर्क करून जेवणाची गैरसोय दूर करण्याचे आवाहन केले आहे.
*वकील श्री.परिमल नाईक.- 9422436805*
*श्री.संतोष (आप्पा) लाड, भाजपा जिल्हा व्यापारी आघाडी, कोल्हापूर.- 9422522525*

प्रतिक्रिया व्यक्त करा