You are currently viewing एडगावच्या सौ.ज्योती पवार यांना “गुरुसेवा गौरव पुरस्कार 2023” जाहीर

एडगावच्या सौ.ज्योती पवार यांना “गुरुसेवा गौरव पुरस्कार 2023” जाहीर

वैभववाडी :

 

नाम. दिपकभाई केसरकर मित्रमंडळ सावंतवाडी यांच्या मार्फत आज दि. 5 सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून उपक्रमशील व चांगले शैक्षणिक कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव केला जातो. या वर्षीचा “गुरुसेवा गौरव पुरस्कार 2023” वैभववाडी तालुक्यातील एडगाव च्या सौ.ज्योती जयवंत पवार यांना जाहीर झाला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा परीषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षिका सौ.ज्योती जयवंत पवार (एडगाव – पवारवाडी) या सद्या विद्या मंदीर शाळा करूळ गावठण येथे कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा. नाम .दिपकभाई केसरकर यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ, सन्मानपत्र स्मृतिचिन्ह आणि ग्रंथ देवुन सन्मानित करण्यात येणार आहे.

सौ.ज्योती पवार या अतिशय दिशा दर्शक असे कार्य करत असून त्यांच्या कार्याबद्दल सर्व एडगावं वासियानी विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन त्यांचे कौतुक केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − four =