आंब्रड-सरमळेवाडी येथे तलवार, सळ्यांनी मारहाण

आंब्रड-सरमळेवाडी येथे तलवार, सळ्यांनी मारहाण

कुडाळ :

 

आंब्रड – सरमळेवाडी येथे तलवार लोखंडे सळी व बांबूच्या काठीने मारहाण झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी बबन दळवी, अमोल दळवी व अतुल दळवी, नंदराज दळवी चार जणांविरुद्ध कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुरेश दळवी यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात फिर्याद केली.

पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार सुरेश दळवी यांचे भाऊ सुधाकर दळवी 9 जून रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तिथे मारुती मंदिरात दिवाबत्ती करून येत होते. बबन दळवी यांच्याशी सुरेश दळवी यांच्या झालेल्या बोलाचालीचा रागातून बबन दळवी यांचा भाऊ नंदराज दळवी व बबन दळवी यांचा मुलगा अमोल दळवी आले. त्यांनी  सुधाकर दळवी यांची अडवणूक करून त्यांच्याशी मोठ मोठ्याने बोलू लागले. त्या आवाजाने सुरेश दळवी तसेच त्यांची पुतणी अक्षता दळवी व तिची आई तेथे सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी पुढे आले.

त्यावेळी अमोल याने हातातील लोखंडी सळी सुधाकर यांच्या पायावर मारली. त्याचवेळी नंदराज यांच्या हातातील तलवार अतूल दळवी यांनी हिसकावून काढून घेतली. त्यावेळी तेथे असलेले बबन दळवी यांनी सुरेश दळवी यांच्या पाठीवर काठीने मारहाण केली. त्यावेळी उपस्थित असलेले पुतणी अक्षता हिने भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता बबन यांनी हातातील काठीने तिच्या डोळ्यावर मारहाण केली.

तसेच त्याच्या हातातील सळी सुरेश त्याच्या पायावर लागली. तसेच या तिघांनी  झटापट करून धक्काबुक्की केली. त्यानंतर हातात फरशी घेऊन आलेल्या अतुल दळवी याने व सर्वांनी सुधाकर दळवी व पुतणी अक्षता यांना घराबाहेर येऊन शिवीगाळ केली. तुम्ही घराच्या बाहेर पडला तर तुम्हाला ठार मारुन टाकेन. तुमच्या घरावर पेट्रोल ओतून घर पेटवून देऊ अशी धमकी दिली.

त्यानुसार कुडाळ पोलिसांनी  बबन दळवी, नंदराज दळवी, अमोल दळवी व अतुल दळवी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याचा आणखी तपास आवळेगाव पोलीस दूरक्षेत्राचे हवालदार चंद्रकांत झोरे करीत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा