You are currently viewing कणकवली नगरपंचायतचे यश पाहून पारकर यांच्या पोटात भीतीचा गोळा….

कणकवली नगरपंचायतचे यश पाहून पारकर यांच्या पोटात भीतीचा गोळा….

शिशिर परुळेकर नगरसेवक कणकवली

महेश सावंत सामाजिक कार्यकर्ते कणकवली

कणकवली नगरपंचायत ची सत्ता यापूर्वी अनेक वर्षे कन्हैया पारकर यांचे बंधू संदेश पारकर यांच्या ताब्यात होती. मात्र कणकवली वासीयांनी आपल्याला नाकारले हे अजूनही पारकर यांच्या मनातून जात नसल्याचे पाहायला मिळत आहे. माजी नगराध्यक्ष संदेश पारकर सत्तेत असताना त्या काळात एकही प्रकल्प किंवा कायमस्वरूपी टिकणारे विकास काम पारकर यांना करता आलेले नाही. याउलट थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार नसतानाही नाविन्यपूर्ण प्रकल्प आणले. अनेक विकास कामे सुरू केली. पोद्दार इंटरनॅशनल स्कूल सारखे महत्वकांक्षी प्रकल्प कणकवलीत सुरू केले. मसुरकर किनई रस्ताही नगराध्यक्ष समीर नलावडे उपनगराध्यक्ष बंडू हर्णे व व आमच्या सर्व नगरसेवकांच्या प्रयत्नातून अस्तित्वात आला. हा रस्ता होऊ नये म्हणून कन्हैया पारकर यांनी किती प्रयत्न केले होते त्याची जरा त्यांनी आठवण करण्याची गरज आहे. कणकवली नगरपंचायत च्या वतीने भटक्या कुत्र्यांची नसबंदी व जनतेला होणाऱ्या त्रासापासून मुक्तता मिळण्यासाठी तातडीने निर्णय घेत टेंडर प्रक्रिया राबविण्याचे जाहीर केले. नगरपंचायत चे एकापाठोपाठ एक यशस्वी होत असलेले प्रकल्प पाहून पारकर यांच्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे. नगरपंचायतची विकासात्मक घोडदौड अशीच सुरू राहिली तर पुढील निवडणुकीत आपल्याला निवडून येण्यासाठी पोषक असा वार्ड तरी राहील का या चिंतेत असल्यानेच कन्हैया पारकर यांच्या कडून सातत्याने नगरपंचायत वर आरोप केले जात आहेत. स्वतः अस्तित्व सिद्ध न करु शकलेल्या कन्हैया पारकर यांना कणकवलीतील जनतेने केव्हाच नाकारले आहे. पण त्याच सोबत त्यांच्या पक्षाने पक्षानेही त्यांना नाकारल्याने पारकर वैफल्यग्रस्त झाले आहेत. नगराध्यक्षांनी कुत्र्यांच्या बाबत जाहीर केलेल्या निर्णयाचे कन्हैया पारकर यांनी अभिनंदन केले असले तरी ते अभिनंदन नगरपंचायत च्या वतीने आम्ही स्वीकारले नसून नाकारले आहे. कारण पारकर यांनी केलेले अभिनंदन केव्हाच यशाच्या दिशेने जात नाही. त्यामुळे त्यांचे अभिनंदन न घेतलेलेच बरे.आमदार नितेश राणे यांनी भटक्या कुत्र्या बाबतचा प्रकल्प जाहीर केला होता त्या प्रकल्पाच्या जागेतच आता कणकवलीतील पकडलेले भटके कुत्रे ठेवण्यात येणार आहेत. व नितेश राणे यांनी ती जागा विनामूल्य नगरपंचायत ला देण्याचेही मान्य केले आहे. त्यामुळे पारकर यांनी नगरपंचायत राबवत असलेल्या उपक्रमांची चिंता करू नये. उपक्रम यशस्वी करणे व कार्य सिद्धीस नेण्यास आमचे आमदार नितेश राणे व नगरपंचायत सत्ताधारी सक्षम आहेत. राज्यात शिवसेनेची सत्ता आहे. पालकमंत्री शिवसेनेचे आहेत. त्या पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील सर्वच शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला असता तर निश्चित त्यांना कार्यसम्राट म्हणता आले असते. पण श्री पारकर यांच्याकडून तसे केव्हाच प्रयत्न झाले नाहीत . नगरपंचायत राबवत असलेले प्रकल्प अडचणीत आणणे व सत्ताधाऱ्यांवर टीका करणे हे एकमेव काम श्री पारकर यांच्याकडून केले जात आहे. नगरपंचायत ला पारकर यांच्या सल्ल्याची गरज नाही. उलट आपला राजीनामा गहाण ठेवून आता राजीनामा न देण्याची भूमिका घेतलेल्या पारकर यांनी आपल्या पक्षातीलच विरोधकांना आपला शहाणपणा दाखवला आहे. अडीच वर्षासाठीचे गहाण ठेवलेले नगरसेवक पद वाचवण्यासाठीच कन्हैया पारकर यांचा हा सारा खटाटोप आहे. पारकर यांनी म्हटल्याप्रमाणे कणकवली शहरात भटक्या कुत्र्यांची पैदास सुरू आहे ही वस्तुस्थिती आहे. हे भटके कुत्रे जेरबंद करण्यासाठी नगरपंचायत लक्ष ठेवून आहे. म्हणूनच नगरपंचायत ने ही पैदास कमी करण्यासाठीच नसबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. ती लवकरच करण्यात येईल व ते पारकर यांनाही लवकरच समजेल. कन्हैया पारकर यानी त्यांच्या इतर नगरसेवकांनाही नगरपंचायत च्या कामाबाबत विचारावे. नगरपंचायतीच्या कामावर त्यांच्याच पक्षाचे व त्यांच्यासोबत निवडून आलेले अन्य नगरसेवक टीका करत नाहीत. त्याचेही आत्मपरीक्षण पारकर यांनी करण्याची गरज आहे. अन्यथा पारकर यांच्या भटक्या कुत्र्यांच्या मागे लागण्याच्या नादात, त्यांना एकला चलो रे ची भूमिका घ्यावी लागणार नाही याची काळजी घ्यावी.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine + 20 =