You are currently viewing स्त्री

स्त्री

*जेष्ठ साहित्यिका, उपक्रमशील, आदर्श शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती, कथाकार अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*स्त्री*

 

स्त्री आणि पुरुष

यांच्यात भेद काय?

दोघांनाही हात आहेत

दोघांनाही पाय!

 

 

दोघांनाही बुद्धी आहे

दोघांनाही मन!

दोघांपाशी आहे खूप

विचारांचे धन!

 

 

तरीही स्त्रीला

का म्हणतात अबला?

अबला नव्हे ती;

ती आहे सबला!

 

 

स्त्री आहे आदिशक्ती.

स्त्री आहे जिजाई.

स्त्री आहे ताराबाई.

ती आहे लक्ष्मीबाई.

ती आहे सावित्री.

ती आहे रमा.

 

ती रान तुडवते.

विमान उडवते.

डोंगर चढते.

लढाई लढते.

 

 

काय आहे तिच्यात कमी?

कमी नाही काही.

तिने कधीच कवेत घेतल्या

दिशा या दाही!

 

 

कवयित्री

अनुपमा जाधव

प्रतिक्रिया व्यक्त करा