You are currently viewing बॅ. नाथ पै कोविड  केअर सेंटरला कुडाळ तालुका मनसेतर्फे स्टीमर मशीन ची भेट

बॅ. नाथ पै कोविड केअर सेंटरला कुडाळ तालुका मनसेतर्फे स्टीमर मशीन ची भेट

कुडाळ :

शालेय शिक्षण संस्था व सामाजिक बांधिलकी ने काम करणाऱ्या संस्थांसमोर एक आदर्श भूत उपक्रम म्हणजे बॅरिस्टर नाथ पै केअर सेंटर. याची दखल घेऊन समाजातील विविध सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती पुढे येऊन आपापल्या परीने या कोविड सेंटरला मदतीचा हात पुढे करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सदर केअर सेंटरला कुडाळ तालुका मनसे पदाधिकाऱ्यांनी नुकतेच पाच स्टीमर मशीन भेट देऊन आम्ही तुमच्या सोबत आहोत. असा धीर देत उमेश गाळवणकर यांच्या नाथ पै शिक्षण संस्थेच्या नर्सिंग महाविद्यालय व फिजिओथेरपी महाविद्यालय यांच्या या स्तुत्य उपक्रमास सर्व कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष प्रसाद गावडे, पदाधिकारी -माजी तालुका अध्यक्ष तथा पिंगुळी ग्रामपंचायत सदस्य-बाबल गावडे, विद्यार्थी मनसे जिल्हा अध्यक्ष कुणाल किनळेकर, कुडाळ तालुका सचिव राजेश टंगसाळी,अणाव सरपंच आप्पा मांजरेकर इत्यादी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve − 4 =