You are currently viewing पतीच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी पत्नीचे निधन

पतीच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी पत्नीचे निधन

वैभववाडी:

पतीच्या निधनाच्या विरहाने पत्नीचे अवघ्या तिसऱ्या दिवशी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. स्वामी समर्थ देवस्थान चे संस्थापक रमेश विश्राम सावंत (७५, रा. डामरे) 26 जुलै रोजी उपचारादरम्यान अल्पशा आजाराने ओरस येथे निधन झाले. तर पत्नी शकुंतला रमेश सावंत (७०) यांचे 28 जुलै रोजी डामरे येथील राहत्या घरी निधन झाले.

सध्या ते फोंडाघाट परिसरात सावंत बाबा या नावाने परिचित होते. ते मुंबई येथे सेंट्रल गव्हर्मेंट मध्ये नोकरीला होते. २००० सली सेवानिवृत्ती झाले. त्यांनी गावी येऊन सन २००६ साली श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज यांचा मठ डामरे येथे बांधला. 2007 साली स्वामींची मूर्ती प्रतिष्ठापना केली. अल्पावधीतच डामरे पंचक्रोशीतील असंख्य भाविकांचे ते चाहते झाले. लोक त्यांना सावंत बाबा म्हणून ओळखू लागले. सध्या ते फोंडाघाट परिसरात सावंत व या नावाने सर्वत्र परिचित होते. डामरे येथील स्वामींच्या मठात त्यांनी असंख्य लोकांना भक्तिमार्ग दाखविला. सेवानिवृत्ती नंतर मिळालेली कमाई त्याने स्वामी सेवेसाठी अर्पण केली होती.

दरवर्षी दिविजा आश्रम पणदुर, आनंदाश्रम अणाव येथील अनाथ लोकांना व मूकबधिर मुलांना दरवर्षी अन्न व वस्त्र दान करून सामाजिक बांधिलकी जोपासत असत. सावंत बाबा यांचा फार मोठा स्वामी भक्त परिवार आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 2 =