You are currently viewing आ. वैभव नाईक यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या पर्यटन महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

आ. वैभव नाईक यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या पर्यटन महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

भव्य दिव्य अशा पर्यटन महोत्सवाच्या आयोजनाने रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध

दांडी समुद्र किनारी उसळला जनसागर

मालवण नगरपालिकेतर्फे दांडी समुद्र किनारी आयोजित मालवण पर्यटन महोत्सव जल्लोष २०२२ चा समारोप रविवारी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत झाला.कोरोना नंतर बच्चे कंपनी पासून अगदी मोठ्यांपर्यत सर्वजण एखाद्या मोठ्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत होते. आ. वैभव नाईक यांनी पुढाकार घेत मालवण नगरपालिकेच्या वतीने भव्य दिव्य अशा पर्यटन महोत्सवाचे आयोजन करून रसिक प्रेक्षकांचा आनंद द्विगणित केला. तीन दिवस सुरु असलेल्या महोत्सवाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दांडी समुद्र किनारी अक्षरशः जनसागर उसळला होता.

समारोपाच्या दिवशी गायिका अक्षता सावंत, कविता राम, गायक विश्वजित बोरवणकर यांच्या बहारदार गाण्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. स्वरांच्या या मोहिनीत सारेच बेधुंद झाले असताना सुप्रसिद्ध हास्य अभिनेते भाऊ कदम व अभिनेत्री रेणुका शिंदे यांच्या स्किटने प्रेक्षकांच्या चेहऱ्यांवर हास्याचे कारंजे फुलले. कोरोनानंतर प्रथमच साजरा झालेला पर्यटन महोत्सव हा एक नवा आरंभ असल्याचे भारदस्त वातावरण तयार झाले होते. दांडीतील स्थानिक दशावतारी कलाकारांकडून कचरासुर हा स्वच्छतेची महती सांगणारा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला.
पहिल्या दिवशी नौका सजावट स्पर्धा, वाळू शिल्प कलाकृती, सायकल रॅली, मालवणी खाद्य पदार्थ पाककला स्पर्धा, ‘आमदार वैभव नाईक श्री’ शरीर सौष्ठव स्पर्धा, गायन स्पर्धा, स्थानिक दशावतार (महिला व पुरुष) इंडीयन आयडॉल फेम रोहित राऊत यांच्या गाण्यांचे सादरीकरण तर दुसऱ्या दिवशी खेळ पैठणीचा व मालवण सुंदरी स्पर्धा आणि नृत्य सादरीकरण असे एका पेक्षा एक सरस कार्यक्रम महोत्सवात संपन्न झाले. सर्व कार्यक्रमांना स्पर्धक व प्रेक्षकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

याप्रसंगी मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे. कोकण पर्यटन विकास समिती उपाध्यक्ष संदेश पारकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे,माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नियोजन समिती सदस्य हरी खोबरेकर,कणकवलीचे नगरसेवक सुशांत नाईक, माजी नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, पंकज सादये,नितीन वाळके, बाबी जोगी,अवधूत मालणकर, पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर, , छोटू सावजी, मंदार ओरसकर, दिलीप घारे, शेखर गाड, माजी नगरसेविका आकांक्षा शिरपुटे,सेजल परब,शीला गिरकर, तृप्ती मयेकर, तपस्वी मयेकर, दर्शना कासवकर,सुनीता जाधव,शिल्पा खोत, दीपा शिंदे,पूनम चव्हाण, किरण वाळके,शेखर गाड, देवगडच्या नगराध्यक्षा चैताली प्रभू ,उपनगराध्यक्षा मिताली सावंत, बुवा तारी,सन्मेश परब, प्रसाद आडवणकर, आतु फर्नांडीस, राहुल परब, किसन मांजरेकर यांच्यासह दांडी येथील महेंद्र पराडकर, अन्वय प्रभू संजीव धुरी, दाजी जोशी, भाऊ मोरजे, महेश कोयंडे, रुपेश प्रभू जयदेव लोणे, भाई जाधव, जगदिश तोडणकर, हेमराज सावजी, रश्मीन रोगे, अक्षय रेवंडकर आदी शिवसेना पदाधिकारी,लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते व मालवण वासीय उपस्थित होते. दांडीवासीयांतर्फे आमदार, मुख्याधिकाऱ्यांसह महेश कांदळगावकर, कार्यक्रमाचे संयोजक प्रणय तेली आणि सूत्रसंचालक ऋषी देसाई यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा