You are currently viewing केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देवबाग बंधाऱ्यासाठी जाहीर केलेल्या १ कोटी खासदार निधीस जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांची मंजुरी

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देवबाग बंधाऱ्यासाठी जाहीर केलेल्या १ कोटी खासदार निधीस जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांची मंजुरी

भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी घेतली जिल्हाधिकारी यांची भेट ; सकारात्मक चर्चा

देवबाग सागरी किनारपट्टीवर अतिक्रमण बाधित धोकादायक ठिकाणी तात्काळ उपाययोजना म्हणून बंधारा उभारणी व्हावी. यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी खासदार फंडातून १ कोटी निधी जाहीर केला. या निधीच्या माध्यमातून होणाऱ्या बंधारा उभारणी खर्चास तात्काळ मान्यता द्यावी. यासाठी भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली.

दरम्यान, सागरी अतिक्रमण बाधित देवबाग किनारपट्टीची स्थिती लक्षात घेता १ कोटी खासदार फंडास मंजुरी देऊन पुढील कार्यवाही तात्काळ केली जाईल. असे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. जिल्हाधिकारी यांच्या तत्पर व सकारात्मक भूमिकेबाबत निलेश राणे यांनी आभार मानले.

यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, दाजी सावजी, भाई मांजरेकर यासह भाजप पदाधिकारी व देवबाग ग्रामस्थ उपस्थित होते.

१९९० दरम्यान आमदार नारायण राणे यांनी देवबाग किनारपट्टीवर बंधारा उभारून गावाला व ग्रामस्थांना संरक्षण दिले. तीन दशके लाटांच्या तडाख्यात असलेला बंधारा आता जीर्ण झाला. अनेक ठिकाणी बंधारा उध्वस्त होत सागरी अतिक्रमणाचा धोका वाढला. काही ठिकाणी तर नव्याने बंधारा उभारण्याची आवश्यकता निर्माण झाली.

१० दिवसांपूर्वी देवबाग दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना ग्रामस्थांनी बंधाऱ्यांचा प्रश्न मांडला. मंत्री राणे यांनी तात्काळ १ कोटी खासदार फंड जाहीर करून अत्यावश्यक ठिकाणी बंधारा उभारणी बाबत कार्यवाही व्हावी असे सांगितले होते.

या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी देवबाग ग्रामस्थ व पतन आधी यांच्या सोबत अतिक्रमण बाधित देवबाग किनारपट्टी भागाची पाहणी केली होती. मंगळवारी जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांची निलेश राणे यांनी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी १ कोटी खासदार फंडला मंजुरी देत पुढील कार्यवाही तात्काळ पूर्ण केली जाईल. अशी भूमिका जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केली. याबाबत निलेश राणे यांनी माहिती देत जिल्हाधिकारी यांच्या तत्पर व सकारात्मक भूमिकेबाबत आभार व्यक्त केले.

सागरी अतिक्रमण बाधित देवबाग गावाची स्थिती पाहून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तात्काळ खासदार निधी दिला. या निधीस प्रशासनाची मंजुरी घेऊन बंधारा काम लवकर सुरू व्हावे यासाठी यशस्वी पाठपुरावा करणारे माजी खासदार निलेश राणे यांचे देवबाग ग्रामस्थ यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे भेट घेऊन विशेष आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − eleven =