You are currently viewing सुनिर्मल फाउंडेशन तर्फे भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन

सुनिर्मल फाउंडेशन तर्फे भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई :

 

सुनिर्मल फाउंडेशन तर्फे सामाजिक क्षेत्रात काम करणारे साहित्यिक ,पत्रकार, शिक्षक, वृत्तपत्रलेखक ,डॉक्टर यांचा सुनिर्मल गौरव पुरस्काराने सन्मान केला जातो. शिवाय गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप सुद्धा केले जाते. असाच एक भव्य दिव्य कार्यक्रम मान्यवर व्यक्तीच्या उपस्थित रविवार दिनांक २२/०५/२०२२ रोजी सकाळी १० वाजता धारावीतील संत कक्कया विकास संस्था, श्री गणेश विद्या मंदिर हायस्कूल, संत कक्कया मार्ग, धारावी येथे होणार आहे.

तरी आपण या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन सुनिर्मल फाउंडेशन च्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री जगन्नाथराव हेगडे (मा. नगरपाल मुंबई ), श्री सुकृत खांडेकर (संपादक दैनिक प्रहार ), श्री विलास खानोलकर (कवी, लेखक, सदस्य फिल्म सेन्सॉर बोर्ड दिल्ली ), डॉ. लक्ष्मण शिवणेकर (ज्येष्ठ शिक्षक तज्ञ /साहित्यिक), मुनीर खान (संपादक झुंजार केसरी), श्री राजेश खंदारे (ज्येष्ठ समाज सेवक), श्री महादेव शिंदे (जेष्ठ समाज सेवक), श्री शिवलिंग व्हकटर (जेष्ठ समाज सेवक ), श्री रमेश कदम (ज्येष्ठ समाज सेवक) आदी मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा