You are currently viewing व्हाईस ऑफ मीडिया सिंधुदुर्गच्या तर्फे १८ मार्च रोजी ओरोस येथे महाआरोग्य शिबीराचे आयोजन..

व्हाईस ऑफ मीडिया सिंधुदुर्गच्या तर्फे १८ मार्च रोजी ओरोस येथे महाआरोग्य शिबीराचे आयोजन..

व्हाईस ऑफ मीडिया सिंधुदुर्गच्या तर्फे १८ मार्च रोजी ओरोस येथे महाआरोग्य शिबीराचे आयोजन..

सावंतवाडी

व्हाईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग आयोजित जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने व उद्योजक विशाल परब प्रायोजित महाआरोग्य शिबिर दि. १८ मार्च २०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग नगरी ओरोस येथे आयोजित करण्यात आले आहे.
हे शिबिर सर्व पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी, गरजू रुग्णांसाठी तसेच कोविड काळात ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या डोळ्यावर झालेला परिणाम विचारात घेऊन विद्यार्थ्यांची विशेष नेत्र तपासणी करण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित सर्व पत्रकारांना आयुष्यमान भारत कार्ड वाटप करण्यात येणार आहे. यावेळी तज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी केली जाणार आहे.
यावेळी जिल्ह्यातील सर्व पत्रकार आणि सिंधुदुर्ग वासियांनी मोठ्या संख्येने या महाआरोग्य शिबिराला उपस्थित राहावे असे आवाहन व्हाईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात येत आहे. यावेळी सावंतवाडी येथे आयोजित पञकार परिषदेत व्हाईस आॅफ मिडिया सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष परेश राऊत, कार्याध्यक्ष समीर महाडेश्वर, जिल्हा उपाध्यक्ष भूषण सावंत, विष्णू धावडे, मिलींद धुरी, सचिव विष्णू चव्हाण, सहसचिव संजय पिळणकर, खजिनदार शैलेश मयेकर, सहखजिनदार नयनेश गावडे, संघटक आनंद कांडरकर, बी एन खरात आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा