You are currently viewing स्व.बाळासाहेबांच्या अखेरच्या दिवसांत उध्दव ठाकरेंनीच त्यांचे हाल हाल केले

स्व.बाळासाहेबांच्या अखेरच्या दिवसांत उध्दव ठाकरेंनीच त्यांचे हाल हाल केले

स्व.बाळासाहेबांच्या अखेरच्या दिवसांत उध्दव ठाकरेंनीच त्यांचे हाल हाल केले

*भाजप प्रवक्ते,आमदार नितेश राणेंचा घणाघाती आरोप

कणकवली :

धारावीच्या सभेत उद्धव ठाकरे म्हणाले होते, स्व. बाळासाहेब राहत असलेली खोली त्यांच्यासाठी पवित्र आहे. बाहेर जाताना त्या खोलीत नतमस्तक होऊन बाहेर पडतो. ज्या बाळासाहेबांना अखेरच्या दिवसात म्हातारा, कुत्रा म्हणणाऱ्या उद्धव ने बाळासाहेबांची अवस्था काय केली हे आम्हाला माहिती आहे. स्वर्गीय हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जिवंत असताना अखेरच्या दिवसांत त्यांना औषधे,जेवण वेळेवर उद्धव ठाकरे यांनी दिले नाहीत. अखेरच्या दिवसांत बाळासाहेबांचे हाल उद्धव नेच केले. आता श्रावण बाळ होण्याचा आव उद्धव ठाकरे यांनी आणू नये.असा टोला भाजप प्रवक्ते,आमदार नितेश राणे यांनी लगावला. कणकवली येथील नीलम कंट्री साईड हॉटेलमध्ये आयोजित परिषदेत ते बोलत होते.
नसबंदी झालेले दोन पिसाळलेले कुत्रे रोज भुंकत आहेत. काल धारावीत उद्धव ठाकरे भुंकला तर आज सकाळी संजय राजाराम राऊत पिसाळलेल्या कुत्र्यासारखा बडबडला. म्हणे फडणवीस यांना केंद्रात गृहमंत्री बनायचे होते म्हणून फडणवीस यांचे पंख छाटून त्यांना भाजपाने उपमुख्यमंत्री केले. संजय राऊत हा खाल्ल्या ताटात घाण करणारा माणूस आहे. संजय राऊत लाच 2019 मध्ये मुख्यमंत्री व्हायचे होते, काही आमदारांना त्याने स्वतःचे नाव सीएम पदासाठी चालवा असे सांगत होता. ह्याचा मालक उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हायची स्वप्ने पाहत असताना हा राऊत आमदारांची बैठक घेऊन नमकहरामी करत होता.म्हणून तर सामना च्या मुख्य संपादक पदावरून काढले आणि मालकीण बाई संपादक झाल्या.अशा शब्दांत भाजपा प्रवक्ते,आमदार नितेश राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला.
राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत म्हणणाऱ्या संजय राऊत वर जोरदार टीका नितेश राणे यांनी केली. एकदा उद्धव ठाकरे पंतप्रधान व्हावेत, एकदा राहुल गांधी म्हणत आहेत. स्वतःचे राजकीय बाप संजय राजाराम राऊत दरदिवशी बदलत आहे. संजय राऊत यांचेवर नाईन्टी मारण्याचा इफेक्ट दिसतो.त्यामुळे बडबड करतो. देवेंद्र फडणवीस सारख्या स्वच्छ चारित्र्याच्या माणसाला संजय राऊत कडून कॅरॅक्टरच सर्टिफिकेट ची गरज नाही अशाही शब्दात आमदार नितेश राणे यांनी राऊत याना फटकारले.

प्रतिक्रिया व्यक्त करा