You are currently viewing नीरवतेच्या काठावर मी ऐकत बसले मौनाला

नीरवतेच्या काठावर मी ऐकत बसले मौनाला

मराठी बालभारती, शॉर्ट फिल्म, थीम सॉंग्स आदींसाठी उत्कृष्ट काव्यलेखन केलेल्या नंदुरबार येथील गझलकारा सौ सुनंदा भावसार यांची अप्रतिम गझल रचना

नीरवतेच्या काठावर मी ऐकत बसले मौनाला
कळले नाही तेथे कोणी साद घातली शब्दाला…

इवली शल्ये विचार करती, खिडकीमधुनी बघणारी…
हसावयाला कोण शिकवते रस्त्यावरच्या दुःखाला?

इकडे-तिकडे कायम पळते पाण्याहुनही चपळ किती…
समजत नाही कसे सावरू पळणार्‍या या चित्ताला…!

सोडुन देना छोट्यामोठ्या गोष्टींनाही कधीकधी…
जीवनातल्या आनंदास्तव टाळत जावे रागाला…!

जीवनातल्या वळणावरती प्रश्नपत्रिका सतत नव्या…
वेगवेगळ्या अशा परीक्षा चुकलेल्या का कोणाला?

©®सौ.सुनंदा सुहास भावसार
नंदुरबार90963 49241

प्रतिक्रिया व्यक्त करा