You are currently viewing शाळा

शाळा

आम्ही बालकवी संस्था सिंधुदुर्ग संस्थापक श्री राजेंद्र गोसावी यांची काव्यरचना

घ्यावा पुर्नजन्मं
व्हावे पावन इथे
नतमस्तक आजही आम्ही
माथा टेकवावा जिथे

फुलते शब्दांची बाग
बालपण बहरते
चिवचिवाट चिमण्यांचा
अंग अंग शहारते

मस्ती , खेळणे , बागडणे
रोज नव नवे वेध
वटवृक्षाच्या सावलीत
जग कल्यांणा बोध

शिकवण शाळेची
जगा लावी वेड
कित्येक जीवांची रुजते
येथेच मुहुर्तमेढ

देव ही व्यापला इथे
कणा कणात कणभर
माय माझी शाळा
माझे विदयेचे मंदीर

राजेंद्र गोसावी .
आम्ही बालकवी संस्था , सिंधुदुर्ग
९४०५७७८७२६

प्रतिक्रिया व्यक्त करा