You are currently viewing आस्था

आस्था

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी गझलकार जयराम धोंगडे लिखित अप्रतिम गझल रचना

थोडे विचारल्यावर आस्था खरी कळाली,
नात्यातली कटूता क्षणात मग जळाली!

येतो वसंत आहे शिशिरास दोष नाही,
पाने तिथे नव्याने येतात जी गळाली!

कुरवाळतोच जो तो आल्यावरी सुखाला,
ना वाटल्यावरी ती आली तशी पळाली!

दिलदार माणसांची होती पिढी निराळी,
स्वार्थात ठार आता सारी मने मळाली!

माणूस माकडाचा काळानुरूप झाला,
कोलीत गावल्यावर पुन्हा तिथे वळाली!

जयराम धोंगडे, नांदेड

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten + three =