You are currently viewing फलज्योतिष

फलज्योतिष

*जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंचचे सदस्य श्रीनिवास गडकरी यांची अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या फलज्योतिष विरोधी अभियान चे एक पुष्प रायगड जिल्ह्यातर्फे गुंफले गेले. त्यात सादर झालेली कविता*

आकाशातील ग्रहताऱ्यांना कशास द्यावी किंमत
आपण आपले भविष्य घडवू, मनात ठेवू हिम्मत

जन्मकुंडली, राहू केतू, वक्री शनिची साडे साती
जनास साऱ्या लुबाडण्याची ही पोटभरुंची युक्ती

जन्म कुंडली बनवणाऱ्यास न ठावे भविष्य आपुले
स्त्री आहे की पुरुष सांगता भले भले ही पार झोपले

पत्रिकेतील मंगळ नडतो तरुण मनांच्या स्वप्नांमध्ये
इतक्या दुरूनही प्रभाव पाडी प्रश्न विचारा मनामध्ये

कड्यात अडकला शनिग्रह पृथ्वी वरती बाधा करतो
कुठल्या कुठल्या दक्षिणेने लगेच केव्हढा शांतही होतो

दूरस्थ या ग्रहगोळ्यांच्या फिरण्या नका जीवनी स्थान देऊ
कठोर मेहनतीने आयुष्य घडवू, साध्य आपुले जिंकून घेऊ

श्रीनिवास गडकरी
रोहा पेण
09130861304

प्रतिक्रिया व्यक्त करा