You are currently viewing गौराई

गौराई

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंचच्या सदस्या ज्येष्ठ कवयित्री ज्योत्स्ना तानवडे यांची काव्यरचना

आल्या ‘गौराई’ या घरी
विराजिल्या मखरात
त्यांच्या प्रसन्न कृपेची
करिताती बरसात !!

दारा तोरण बांधिले
रांगोळीचे रेखाटन
त्यांच्यासाठी दारापुढे
सजविले वृंदावन !!

ज्येष्ठा कनिष्ठा बहिणी
गोड माहेरवाशिणी
त्यांच्या माहेरी येण्याने
डोळा आनंदाचे पाणी !!

कौतुकाच्या ग पाहुण्या
किती करून त्यांचे लाड
त्यांच्यासाठी रांधियले
नाना पदार्थ हे गोड !!

किती गाऊ त्यांचे गुण
त्यांच्या गुणा नाही पार
दोन दिस आल्या तरी
त्यांचा वास सालभर !!

माझी माऊली दयाळू
सर्वांवरी कृपा करी
तुझ्या समृद्धीच्या खूणा
ठेव आई घरी दारी !!

तुझ्या समृद्धीच्या खूणा
ठेव आई घरी दारी !!

ज्योत्स्ना तानवडे.
पुणे.५८

प्रतिक्रिया व्यक्त करा

eleven − 9 =