You are currently viewing बी. एड. बॅचचा माडखोलमध्ये रंगला स्नेहमेळावा

बी. एड. बॅचचा माडखोलमध्ये रंगला स्नेहमेळावा

३३ वर्षांनी भेट: मित्र मैत्रिणींचे चेहरे आनंदाने फुलले

देवगड येथील शां.कृ.पंतवालावलकर अध्यापक महाविद्यालयातून बी. एड. पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या १९८८-८९ च्या बॅचचा स्नेहमेळावा माडखोल येथे उत्साहात झाला. तेहत्तीस वर्षांनी एकमेकांना मित्र मैत्रिणी भेटल्याने सर्वांचे चेहरे आनंदाने उजळून निघाले होते. ओळखपरेड दरम्यान काहींनी तेहत्तीस वर्षाच्या प्रवासातील कटू गोड अनुभव कथन करून हसवले आणि रडवलेही.

यावेळी सदाशिव गवस, भास्कर जड्ये,गुरूदास कुसगावकर, संतोष वायंगणकर, प्रभाकर धुरी, भरत गावडे,दत्तप्रसाद खानोलकर, संजय जोशी, दिनेश आजगावकर, जयंत साटम, सी. आर. सावंत,दशरथ घाडी,आर.एच.सावंत,अंकुश तावडे, जनार्दन मराठे, अवधूत येनजी, चंद्रशेखर सातार्डेकर, प्रशांत करमळकर, संजय देसाई, एस. के. देसाई, जगदीश धोंड, गोपाळ गोडबोले, शरद आपटे, विजय गावकर, राजेंद्र पाटील, प्रकाश घाडी,दादा रेडकर, अण्णा राऊळ, अभय मुणगेकर, मोहन भांडिगरे,विजय देवदास, अनिल लोके,एन.डी.पाटील, आनंदा जाधव, अरुण साखळकर, विलास देऊलकर, सखाराम मुळे, शैलेंद्र अमनगी, प्रशांत करमळकर, लक्ष्मण आंबेरकर,सुनेत्रा कोळंबकर, चारुता काळे, प्रवीणा सावंत, सुजाता धानजी, राजदा सरमळकर, संध्या सामंत, भारती खडपकर,अनुराधा हिर्लेकर,अलका सातार्डेकर, वीणा पटवर्धन, वीणा प्रभुदेसाई, खैरु खान, मनिषा सामंत, गीता जुवेकर, सुषमा जुवेकर, मंगल बाक्रे, सरोज तोरसकर, प्रभा गवंडे, कुंदा साटम, माधुरी साटम, शुभांगी रेडकर, तारका सावंत, गीता सावंत, बेबी राऊळ आदी ६४ मित्र मैत्रिणी उपस्थित होत्या.

माडखोल येथील सावंत फार्म हाऊसमध्ये स्नेहमेळावा झाला. मेळाव्याची सुरवात वीणा पटवर्धन यांनी गायिलेल्या ईशस्तवनाने झाली. त्यानंतर सर्वांनी आपापला परिचय करुन दिला. नोकरी व्यवसायानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या सर्वांशी संपर्क करून एकाच मंचावर आणण्याचे काम केल्याबद्दल सर्वांच्या वतीने सदाशिव गवस यांचा सत्कार करण्यात आला.

गाण्यांची मैफल, विडंबन काव्य,किस्से आणि वात्रटिका. चारुता काळे यांनी शिक्षका होशी तू बेजार ही शिक्षकांची व्यथा मांडणारी विडंबन कविता तर स्नेहमेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आठवणींचे पक्षी ही कविता सादर केली. संध्या वायंगणकर यांनी मधु मागशी माझ्या सख्यापरी हे भावगीत म्हटले.शरद आपटे यांनी रंग और नूर की बारात किसे पेश करु हे गीत म्हटले तर गुरुदास कुसगावकर यांनी कानडा राजा पंढरीचा गायिले. प्रभाकर धुरी यांनी सखी मंद झाल्या तारका तर अलका सातार्डेकर यांनी शोधिशी मानवा राऊळी अंतरी हे गीत गायिले. विजय गावकर यांनी किस्से सांगत सुख म्हणजे नक्की काय असते हे गाणेही म्हटले.

तर मोहन भांडिगरे यांनी रामदास फुटाणे यांच्या वात्रटिका ऐकवल्या. सदानंद गवस यांनी गौळण म्हटली. वीणा पटवर्धन यांनी तुम्हावर केली मी मर्जी बहाल ही लावणी म्हटली. पुढच्यावर्षीचा स्नेहमेळावा कोल्हापूरमध्ये तर २०२४ चा मालवणमध्ये करण्याचे निश्चित करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा