You are currently viewing माजी खासदार निलेश राणे यांनी घेतले प.पू. राऊळ महाराज समाधी दर्शन

माजी खासदार निलेश राणे यांनी घेतले प.पू. राऊळ महाराज समाधी दर्शन

कुडाळ :

 

प. पू. सद्गुरू समर्थ विनायक अण्णा राऊळ महाराज यांच्या पहिल्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त प. पू. सद्गुरू समर्थ राऊळ महाराज व प. पू. सद्गुरू विनायक अण्णा राऊळ महाराज यांच्या समाधीचे भाजपचे प्रदेश सरचिटणीस व माजी खासदार निलेश राणे यांनी दर्शन घेतले यावेळी राऊळ महाराज भक्त मंडळाच्या महिलाच्या वतीने माजी खासदार निलेश राणे यांचे औक्षण करण्यात आले तसेच ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांच्यावतीने स्वागत करण्यात आले.

यावेळी राऊळ महाराज ट्रस्टचावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्याध्यक्ष विठोबा राऊळ, दशरथ राऊळ, उद्योजक अशोक कदम, अरविंद कदम, श्री पांगे त्याचबरोबर जिल्हा कार्यकारणी सदस्य आनंद शिरवलकर, शहराध्यक्ष राकेश कांदे, राजेश पडते, माजी सरपंच महिला लोकप्रतिनिधी पांचाळ, माजी उपसरपंच अजय आकेरकर, सतीश माडये, नगरसेवक अभिषेक गावडे, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, सचिन पालकर यांच्यासह राऊळ महाराज भक्तपरिवार बहुसंख्येने उपस्थित होता. राऊळ महाराज भक्त मंडळाच्या महिला भगिनींच्या वतीने सर्व प्रथम औक्षण करून आणि ट्रस्टचा पदाधिकाऱ्यांनी प्रवेशद्वारावर भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी समर्थ राऊळ महाराज व समर्थ अण्णा महाराज यांच्या समाधी मंदिरात जाऊन दर्शन घेतले व यावेळी त्यांचा ट्रस्टचा वतीने शाल ,श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा